“सडक सुरक्षा जीवन रक्षा “रस्ता सुरक्षा अभियान 2025/ 26.
"सडक सुरक्षा जीवन रक्षा" रस्ता सुरक्षा अभियान या निमित्ताने राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे पदाधिकारी व महाराष्ट्र वाहतूक सेवा समितीचे पदाधिकारी यांनी वाहतूक वरिष्ठ अधिकारी यांची भेट घेतली.
*महाराष्ट्र रस्ता सुरक्षा अभियान २०२५/२६ अंतर्गत ठाण्यात रस्ता सुरक्षा* *सप्ताह उत्साहात*
ठाणे प्रतिनिधी :
“रस्ता सुरक्षा – जीवन रक्षा” या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्र रस्ता सुरक्षा अभियान २०२५/२६ अंतर्गत ठाणे शहरात रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.

ठाणे वाहतूक विभागातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे.

दरवर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या सप्ताहात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. या अभियानाअंतर्गत वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी नागरिकांशी थेट संवाद साधत वाहतुकीचे नियम, अटी आणि सुरक्षिततेचे महत्त्व समजावून सांगत आहेत.

हेल्मेटचा सक्तीने वापर, सीटबेल्ट लावणे, सिग्नलचे नियम पाळणे, लेन शिस्त राखणे, विरुद्ध दिशेने वाहन न चालवणे, ओव्हरलोड न करणे, लायसन्स सोबत ठेवणे याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

विशेषतः दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे, अवजड वाहनचालकांनी सीटबेल्ट लावणे, रिक्षाचालकांनी ओव्हरसीट प्रवासी न भरता नियमांचे पालन करणे, यामुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, असा संदेश या सप्ताहातून दिला जात आहे.

रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ व महाराष्ट्र वाहतूक सेवा समिती यांच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे वाहतूक कळवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री, संजय जाधव, राबाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री, तुकाराम पावडे, वाशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री, शिवाजी भांडवलकर , तुर्भे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री, संजय पाटील, महापे पी, एस आय,श्री, नरेंद्र गिरासे, मुंब्रा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री, अतुल आहेर, राबोडी पी एस आय श्री, अजय राणे,यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रावण पाटील, महाराष्ट्र वाहतूक ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री , रामदास वाढवणे, ठाणे शहर अध्यक्ष, श्री, रमेश राऊत, महाराष्ट्र वाहतूक.उपाध्यक्ष सौ ,शोभा लोणारे, आदी उपस्थित होते. त्यांनी रस्ता सुरक्षा अभियानाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या व वाहतूक विभागाच्या कार्याचे कौतुक केले.

रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता वाढून अपघातमुक्त महाराष्ट्र घडावा, हीच या अभियानामागील प्रमुख भावना आहे.




