महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी सुमित्रा पवार राज्याच्या इतिहासात पहिल्या महिला उपमुख्यमंत्री.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर आज सुमित्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

पत्रकार कैलासराजे घरत
खारपाडा पेण
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार
राज्याच्या इतिहासात पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादापवार यांचे विमान अपघातात बारामती येथे दुखद निधन झाले, त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर ओढावलेले संकट बाजूला सारून पक्षाच्या भविष्याकरिता धीरोदात्तपणे सुनेत्रा पवार यांनी पुढे येऊन राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची निवड झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी कार्यक्रम संपन्न झाला. राज्याच्या इतिहासात पहिल्याच महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद झाली आहे. अजित पवार यांना स्मरूण त्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यावेळी एकद वादा अजितदादा… अजितदादा अमर रहे अशा घोषणांनी राजभवनचा सेंट्रल हॉल दुमदुमून गेला.
सुनेत्रा पवार हे समाजकारण आणि राजकारणातील एक खंबीर नेतृत्व आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात ‘काकी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनेत्रा पवार या केवळ एका राजकीय घराण्यातील सून नसून, त्यांनी स्वतःच्या कामातून आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सुनेत्रा पवार या मूळच्या धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील आहेत. तर त्यांचे वडील बाजीराव पाटील आहेत. बाजीराव पाटील हे जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित प्रादेशिक नेते होते.त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा राजकीय वारसा असून, सुनेत्रा पवार यांचे भाऊ पद्मसिंह पाटील यांनीही महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची पदे भूषवली आहेत.त्यामुळे राजकारणाचे बाळकडू त्यांना माहेरूनच मिळाले होते. १९८५ मध्ये त्यांचा विवाह ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुतणे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झाला होता. त्यांना पार्थ पवार आणि जय पवार अशी दोन मुले आहेत. अजित पवार राजकारणात सक्रिय असताना, सुनेत्रा पवार यांनी बारामती आणि आसपासच्या परिसरातील सामाजिक कामांची धुरा सांभाळली.बारामतीमधील नामांकित शिक्षण संस्था ‘विद्या प्रतिष्ठान’च्या त्या विश्वस्त आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले आहेत. एन्व्हायरो व्हिल (Environmental): पर्यावरणाबद्दल त्यांना विशेष ओढ आहे. त्यांनी बारामतीमध्ये पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि जलसंधारणाच्या कामात मोठे योगदान दिले आहे.तसेच बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत.




