महाराष्ट्र

महाराष्ट्र रस्ता सुरक्षा अभियान 2025 /26. “सडक सुरक्षा जीवन रक्षा”

"सडक सुरक्षा जीवन रक्षा" या उपक्रमाद्वारे सडक सुरक्षा अभियान. ठाणे जिल्हा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ व महाराष्ट्र वाहतूक सेवा समिती यांनी सदिच्छा भेट घेतली.

  • fi

    *महाराष्ट्र रस्ता सुरक्षा अभियान २०२५/२६ अंतर्गत ठाण्यात रस्ता सुरक्षा* *सप्ताह उत्साहात*

ठाणे प्रतिनिधी :
“रस्ता सुरक्षा – जीवन रक्षा” या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्र रस्ता सुरक्षा अभियान २०२५/२६ अंतर्गत ठाणे शहरात रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. ठाणे वाहतूक विभागातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे.

fi

दरवर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या सप्ताहात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. या अभियानाअंतर्गत वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी नागरिकांशी थेट संवाद साधत वाहतुकीचे नियम, अटी आणि सुरक्षिततेचे महत्त्व समजावून सांगत आहेत. हेल्मेटचा सक्तीने वापर, सीटबेल्ट लावणे, सिग्नलचे नियम पाळणे, लेन शिस्त राखणे, विरुद्ध दिशेने वाहन न चालवणे, ओव्हरलोड न करणे, लायसन्स सोबत ठेवणे याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

fi

विशेषतः दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे, अवजड वाहनचालकांनी सीटबेल्ट लावणे, रिक्षाचालकांनी ओव्हरसीट प्रवासी न भरता नियमांचे पालन करणे, यामुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, असा संदेश या सप्ताहातून दिला जात आहे.
उन्हाळा, पाऊस, वारा यांची पर्वा न करता बाराही महिने रस्त्यावर उभे राहून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक पोलीस अधिकारी, पुरुष व महिला कर्मचारी अहोरात्र सेवा देत आहेत. त्यांच्या या निस्वार्थ सेवाभावाला राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाकडून सलाम करण्यात आला.
रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ व महाराष्ट्र वाहतूक सेवा समिती यांच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे वाहतूक उपायुक्त मा. पंकज शिरसाट, नौपाडा वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ, गौरी मोरे मॅडम, ठाणे नगर वाहतुक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ, रोहिणी सोनार मॅडम,कापूरबावडी वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री, श्रीकांत सोंडे यांची सदिच्छा भेट घेतली.

fi

यावेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रावण पाटील, सचिव हिरादास सोनवले, कार्याध्यक्ष विलास सावंत, उपाध्यक्ष प्रवीण माळी आदी उपस्थित होते. त्यांनी रस्ता सुरक्षा अभियानाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या व वाहतूक विभागाच्या कार्याचे कौतुक केले.

fi

रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता वाढून अपघातमुक्त महाराष्ट्र घडावा, हीच या अभियानामागील प्रमुख भावना आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button