महाराष्ट्र
ठाणे, कलवा पूर्व घोलाई नगर येथे ठाणे महानगरपालिकेची फेरीवाल्यांवर तोडक कारवाई. त्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेची कळवा प्रभाग समिती येथे जाऊन एडवोकेट दिनानाथ पांडे व फेरीवाले व भाजपा कार्यकर्ते यांनी निवेदन दिले.
भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा सचिव एडवोकेट माननीय दीनानाथ पांडे यांचे फेरीवाल्यांना आश्वासन व पाठिंबा.

*कलवा पूर्व घोलाई नगर येथे ठाणे महानगरपालिकेची फेरीवाल्यांवर तोडक कारवाई.*
- ठाणे, कळवा पूर्व गोलाई नगर दहा डिसेंबर रोजी, ठाणे महानगरपालिका कळवा प्रभाग समितीच्या उपायुक्त माननीय सौ,ललिता जाधव व ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी, गोलाई नगर येथे रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या फेरीवाल्यांवर तोडक कारवाई केली, त्याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे, ठाणे जिल्हा सचिव एडवोकेट माननीय दिनानाथ पांडे हे घटनास्थळी पोहोचले, त्यांनी महानगरपालिकेच्या उपायुक्त सौ,ललिता जाधव यांना विनंती केली, फेरीवाले गोरगरिबांच्या पोटावर न मारता, त्यांना सवलत द्या व तुम्हाला रहदारीला त्रास होत असेल, तर फेरीवाले तुम्ही सांगाल तसे वागतील, व रहदारीला त्रास होणार नाही अशी आपली दुकाने लावतील, फेरीवाले गोरगरीब रोज कमवतात, व रोज खातात त्यांचे नुकसान करू नका, अशी एडवोकेट दिनानाथ पांडे यांनी विनंती केली, परंतु महानगरपालिकेच्या उपायुक्त सौ, ललिता जाधव यांनी न जुमानता फेरीवाल्यांवर तोडक कारवाई केली, त्या अनुषंगाने एडवोकेट दिनानाथ पांडे यांनी, फेरीवाल्यांना समजावून धीर दिला, व फेरीवाल्यांबरोबर चर्चा केली, व फेरीवाल्यांना पाठिंबा दिला, आज 11 तारखेला भाजपा जिल्हा सचिव एडवोकेट दिनानाथ पांडे, यांनी ठाणे महानगरपालिकेच्या कळवा प्रभाग समिती येथे, शेकडो फेरीवाले व भाजपा कार्यकते येऊन उपायुक्त सौ, ललिता जाधव यांना बुधवार बाजार पुन्हा सुरू करण्यात यावा या विषयी निवेदन दिले.

माध्यमांशी बोलताना भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा सचिव, माननीय अँड, दीनानाथ पांडे यांनी ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त व अधिकारी यांना समजावून सांगितले, बुधवार बाजार हा गोरगरीब फेरीवाले लावत असतात त्यांना परवानगी द्या ,नाहीतर आम्ही गोलाई नगर या ठिकाणी जनआंदोलन उभे करू,
हे तुम्ही सूचना समजा किंवा आदेश समजा असेही एडवोकेट दीनानाथ पांडे यांनी ठणकावून सांगितले.



