महाराष्ट्र

ठाणे आंबेडकर रोड येथे समविचारी संघटनांची बैठक संपन्न.

ठाणे आंबेडकर रोड येथे रिपब्लिकन पार्टी, संभाजी ब्रिगेड, शेतकरी संघटना, बहुजन वंचित, आम आदमी पार्टी, ताराराणी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड ,राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ या सर्व लहान संघटनांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समविचारी व पुरोगामी विचारांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन बैठक घेतली.

प्रतिनिधी, ठाणे,

ठाणे आंबेडकर रोड येथे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडी, रिपब्लिकन पार्टी, शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड, ताराराणी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, अशा विविध संघटनांची महानगरपालिकेच्या निवडणुकी विषयी एकत्र येऊन बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली त्याचप्रमाणे अंध, मुखबधिर व विकलांग यांच्याही विचार केला गेला त्यानंतर ठाण्यातील रस्ते पाणी लाईट व खाडी संरक्षण व सुरक्षा सुंदर ठाणे व हरित ठाणे या विषयावर संदीप खांबे यांनी उपस्थितांना संबोधित केले, विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले,

ताराराणी ब्रिगेडचे महिला कार्यकर्त्या यांनी रुपयाच्या किंमत कमी झाली त्या विषयावर विचारमंथन केले, यावेळी पुरोगामी विचाराचे सर्व लहान-मोठ्या संघटना एकत्र येऊन आज दिनांक  14/12 /2025, रविवारी संध्याकाळी सात वाजता आंबेडकर रोड ठाणा येथे रिपब्लिकन पार्टीचे संदीप खांबे, संभाजी ब्रिगेडचे चंद्रशेखर पवार, शेतकरी संघटना, आम आदमी पार्टी, ताराराणी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ इतर सर्व पुरोगामी विचारांचे पदाधिकारी कार्यकर्ते व पत्रकार बांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या बैठकीत उपस्थिती लावली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button