कळवा मुंब्रा वीटावा येथील रिक्षा चालक व मालक यांना वाहतूक पोलीस अधिकारी यांच्याकडून समज व सूचना देण्यात आल्या.
कळवा मुंब्रा वीटावा येथील रिक्षा चालक व मालक यांना विटावा वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपविभागीय माननीय संजय जाधव साहेब यांनी समज व सूचना दिल्या.

*ठाण्यातील कळवा व विटावा येथील रिक्षा चालक व मालक यांना वाहतूक पोलीस अधिकारी यांनी वाहतुकीच्या नियमांचा समज देऊन सूचना दिल्या.*
आज दिनांक ०१/१२/२०२५ रोजी दुपारी १ ते ३ वाजे पावेतो साहेबा हॉल, कळवा, ठाणे येथे माननिय पोलीस आयुक्त, श्री अशुतोस डुंबरे, माननिय सह पोलीस आयुक्त, श्री ज्ञानेश्वर चव्हाण, माननिय पोलीस उपायुक् ( वाहतूक ), श्री पंकज शिरसाठ, यांचे मार्गदर्शनाखाली माननिय सहाय्यक पोलीस आयुक्त, ठाणेनगर विभाग ( वाहतूक) श्रीमती अंजली भोईर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळवा वाहतूक उपविभाग, श्री संजय जाधव यांनी कळवा विभागातील सर्व रिक्षा चालक संघटनेचे पदाधिकारी, रिक्षा मालक व चालक पुरुष व महिला असे ५०० ते ७०० जण उपस्थितीत मार्गदर्शन सभा पार पडली.
या सभेमध्ये रिक्षा चालकांनी पाळावयाचे नियम व रिक्षा चालवताना गणवेशात राहणे, संदर्भात असणारे नियम सिग्नल संदर्भात असणारे नियम, विरुद्ध दिशेचे असणारे नियम ,
कार्यक्रमामध्ये वृद्ध पेशंट प्रवासी यांना रिक्षा चालकांनी मदत करावी त्यांच्या हरवलेलं राहिलेलं सामान वाहतूक ऑफिसमध्ये जमा करावं अथवा त्यांच्यापर्यंत पोहोचवावं अशा प्रकारची लोकांच्या विश्वास निर्माण करणारी कामे तसेच रिक्षा चालकांना समाज विघातक कृत्य आढळल्यास पोलिसांची मदत घेऊन त्यांना माहिती द्यावी,
तसेच सध्या कळवा स्टेशन पूर्व येथील जो प्रवासी मार्ग आहे तो रेल्वेच्या माध्यमातून बंद होऊन दुसऱ्या ठिकाणी वळविण्यात येणार आहे, पुलाच्या वरून सर्व प्रवासी पुढे जाऊन उतरणार आहेत, प्रवाशांची ये जा पुलावरून होणार आहे, त्या संदर्भात दिशा बदलण्यात रिक्षा टॅक्सी युनियन ला टीएमसी व रेल्वे प्रशासनाच्या पत्रव्यवहारातून सर्वतोपरी सहकार्य मिळावे अशी विनंती, रिक्षा स्थानकाच्या सदस्यांच्या माध्यमातून करण्यात आली.
यावर साहेबांनी योग्य सल्ला मिळेल योग्य कारवाई करा पत्रव्यवहार करा असे आदेश दिले, इतर काही समस्या नसल्यास तूर्तास कार्यक्रम थांबवतो असं सांगून आभार प्रगट व्यक्त करून कार्यक्रम संपला असे जाहीर करतो, या कार्यक्रमाला कळवा खारेगाव येथून रिक्षा चालक-मालक वाहतूकदार यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली व अधिकारी यांनी दिलेल्या सूचनेचे पालन करावे अशी समजूत घातली.




