महाराष्ट्र
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन. जन स्वराज्य वेल्फेअर ट्रस्ट.
ठाण्यातील जन स्वराज्य वेल्फेअर ट्रस्ट चे अध्यक्ष, माननीय राजन पाटील यांच्याकडून भीम अनुयायी यांना फळे ,पाणी व नाश्ता वाटप.

ठाणे,६ डिसेंबर,
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जन स्वराज्य वेल्फेअर ट्रस्ट कडून फळे व नाश्ता वाटप.
जन स्वराज्य वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष, माननीय राजन पाटील यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार व फुले वाहून अभिवादन केले.
याप्रसंगी जन स्वराज्य वेल्फेअर ट्रस्टचे व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
- जनस्वराज्य वेल्फेअर ट्रस्टचे व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मुंबई नाशिक महामार्ग खारेगाव टोलनाका येथे येऊन जन स्वराज्य वेलफेअर ट्रस्ट चे अध्यक्ष, राजन पाटील यांनी आपल्या शुभहस्ते मुंबई दादर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला जाणाऱ्या टेम्पो, ट्रक, रिक्षा यांना थांबवून भीम अनुयायी यांना फळे, पाणी व नाश्ता वाटप केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.





