महाराष्ट्र
ठाणे लोकराज्य समिती ठाणे शहर वाचवा.
जल जंगल जमीन बचाव आंदोलन दशा व दिशा याबाबत कायदेशीर मार्गदर्शन.

ठाणे लोकराज्य समिती,
जल जंगल जमीन या विषयावर ठाणे एन के टी कॉलेज येथे ठाणे लोकराज्य समितीकडून बैठक आयोजित करण्यात आली, या बैठकीत मा, न्यायाधीश मा, सी , एल थुल साहेब यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले,
याप्रसंगी माननीय श्री शरदचंद्र जाधव वकील मुंबई उच्च न्यायालय, माननीय श्री किशोर दिवेकर वकील मुंबई उच्च न्यायालय, श्रीमती वैशाली पाटील समाजसेविका, माननीय श्री डी जे बक्षी ग्राम सुधार समिती अध्यक्ष, या बैठकीत जल जंगल जमीन बचाव आंदोलन दशा व दिशा या बाबत कायदेशीर चर्चा करण्यात आली व ठाणेकरांना मार्गदर्शन करण्यात आले, या कार्यक्रमाला ठाण्यातील शेकडो महिला व नागरिक यांनी उपस्थिती लावली.



