महाराष्ट्र

ठाणे जिल्हा वाहतूक सेवा संघ व महाराष्ट्र वाहतूक सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट..

वाहतूक उपायुक्त मा, पंकज शिरसाट यांना राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे पदाधिकारी निमंत्रण पत्रिका देतांना..

*ठाणे जिल्हा वाहतूक सेवा संघ व महाराष्ट्र वाहतूक सेवा समिती च्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उपायुक्तांची भेट*

ठाणे – १३/११/२०२५, गुरुवार,

  • ठाणे शहरात होणारी वाहतूक समस्या व या समस्येमुळे वाहतूक चालकांना तसेच सर्वसामान्य व्यक्तीला रोजच्या रोज होणारा त्रास या समस्येवर होणारा तोडगा काढण्यासाठी आज ठाणे जिल्हा वाहतूक सेवेचे अध्यक्ष, मा,विजय यादव व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित महाराष्ट्र वाहतूक सेवा समिती चे अध्यक्ष, मा,श्रावण पाटील यांनी शिष्टमंडळासहीत ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांची घेतली भेट.
    उपायुक्त पंकज शिरसाठ यांच्या सोबत तासभर झालेल्या चर्चेत ठाणे शहरात होणाऱ्या वाहतूक समस्येमुळे चालकांना व सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास याबाबत विजय यादव यांनी उपायुक्त शिरसाठ यांना माहिती दिली.
    यावेळी उपायुक्त शिरसाठ यांनी वाहतूक समस्या सोडविण्याबाबत शिष्टमंडळाला आश्वासन दिले. याप्रसंगी शिष्टमंडळामध्ये वाहतूक संघाचे देवेंद्र राजपूत, रविंद्र साळुंके, दत्ता देसाई, हिरादास सोनावले, विलास सावंत, विनय गजरे , राजाराम गायकवाड इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button