नवी मुंबई वाशी सीवूड येथे ज्येष्ठ नागरिक गीत संगीताचा कार्यक्रम संपन्न.
विरंगुळा केंद्राच्या विशेष सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी गीत संगीत कार्यक्रम आयोजन.

- कैलासराजे घरत
मुंबई प्रतिनिधी
*सीवूड येथील जेष्ठ नागरिक गीत संगीताच्या कार्यक्रमात मंत्रमुग्ध !!टि.एम.जी. क्रीयेशन्सच्या वतीने सीवूड -दारावे जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात “गुन गुना रहे है भौरे” हा गीत संगीताचा कार्यक्रम जेष्ठ नागरिकां करीता सीवूड दारावे जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या विशेष सहकार्याने नुकताच आयोजित करण्यात आला होता. सदरहु कार्यक्रमाची निर्मिती व संकल्पना एन.डी.खान यांची होती. तर सौ.सलमा खान ह्या आयोजक होत्या. तर डॉ. विजय मोरे हे सह आयोजक होते. सदर प्रसंगी, सीवूड दारावे जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे सचिव प्रकाश सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. MLKSS आणि ABF चे संस्थापक एन.डी.खान यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राने एका वर्षात तीन वेळा ( Hatric) संगीतमय कार्यक्रम करण्याची संधी दिली. त्याबद्दल सर्व कार्यकारी मंडळ आणि सभासदांचे धन्यवाद व्यक्त केले. यावेळी सुखदा ठाकूर, अशोक डिका, डॉ.विजय मोरे, सुनिता भुजबळ, विद्या डोंबे, विजय सूर्वे, मिलिंद जाधव, निर्मला धोत्रे, सुरेश लऊळकर, मधुसूदन शेर्लेकर आणि दिपक कदम यांनी हींदी व मराठी गीते सादर करुन, जेष्ठ नागरिकांना मंत्रमुग्ध केले. सदरहु कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. विद्या डोंबे यांनी उत्कृष्टपणे केले. तर Karavoke चे व्यवस्थापन विजय सूर्वे यांनी केले. याप्रसंगी सामाजिक व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करीता काशिनाथ जाधव यांना टि.एम.जी.क्रीयेशन्स आणि अमरदीप बालविकास फाउंडेशनच्या वतीने “विशेष पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले. तसेच जेष्ठ समाजसेविका सौ.नंदा डेरे यांना सुध्दा टि.एम.जी. क्रीयेशन्स च्या वतीने सन्मानित करण्यात आले. यावेळी सिने अभिनेत्री उर्मिला डांगे, ॲड.मेघा धुमाळ,माधवी सूर्यवंशी, स्नेहा चांदोरकर, एच.एन.पाटील, सौ. पाकीजा अत्तार, सुनिल जोशी, सौ. लता सोनावणे, राजकुमार ताकमोगे, सौ. मीना ताकमोगे, अब्दुल गनी आत्तार, संतोष भालेराव आणि पूजा मन्डोरा यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.




