राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे पदाधिकारी यांच्या वाढदिवस साजरा.
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वारंशे यांच्या वाढदिवस गुरुकुल मध्ये साजरा.

*भूतपूर्व जिल्हाध्यक्ष राजेंद्र वारंशे यांचा वाढदिवस गुरुकुलमध्ये उत्साहात साजरा*
रायगड : राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे भूतपूर्व रायगड जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र वारंशे यांचा वाढदिवस आज दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पारंपरिक पद्धतीने व सामाजिक जाणीव जपत गुरुकुल परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला.
वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापून अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास रायगड जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व सदस्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली.
या प्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी, अन्याय अत्याचार निवारण समितीचे महाराष्ट्र राज्य सचिव, राज्य संघटक प्रीतमसिंह चोहान, जिल्हाध्यक्ष धनाजी पुदाले, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गायकवाड, जिल्हा सचिव राजपाल शेगोकार, खालापूर तालुकाध्यक्ष बालाराम सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
गुरुकुलचे प्रमुख ह.भ.प. रामदास पाटील यांच्या आशीर्वादाने व वारंशे यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, वारंशे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गुरुकुलातील अनाथ व गरजू मुलांसोबत उत्सव साजरा करून समाजासमोर एक वेगळा आणि प्रेरणादायी आदर्श ठेवला.
उपस्थित मान्यवरांनी वारंशे यांच्या पत्रकारितेतील योगदानाचे कौतुक करत त्यांना दीर्घायुष्य व यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सांगता अभिष्टचिंतन, आशीर्वाद व स्नेहभोजनाने करण्यात आली.




