महाराष्ट्र

मुंब्रा येथे झालेल्या मोर्चात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार व कार्यकर्ते यांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा देशविरोधी घोषणा दिल्याबद्दल त्यांच्यावर कळवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा यांची मागणी.

मुंब्रा येथे मोर्चात देश विरोधी घोषणा देणारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी व आमदार यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा यांनी आज सहाय्यक आयुक्त पोलीस कलवा सौ, प्रिया देविदास डमाळे यांना निवेदन दिले.

प्रतिनिधी, ठाणे,

मुंब्रा येथे मोर्चेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते व आमदार यांनी देशविरोधी घोषणा दिल्या म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी कडून करण्यात येत आहे.

मुंब्रा येथे देश विरोधी पाकिस्तान जिंदाबाद घोषणांच्या विरोधात  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, याविषयी कळवा सहाय्यक पोलीस आयुक्त सौ,प्रिया देविदास डमाळे यांच्याकडे भारतीय जनता पार्टी ठाणे यांची मागणी.*Í

भारतीय जनता पार्टी कळवा मुंब्रा विधानसभेतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांच्या मागणीनुसार सोशल मीडियावर व काही न्यूज चैनल वर नॅशनल काँग्रेस पार्टी एनसीपी शरद पवार गट आमदार जितेंद्र आव्हाड व त्यांच्या समर्थकांनी काढलेल्या मोर्चामध्ये पाकिस्तान जिंदाबाद या देश विरोधी घोषणा देण्यात आल्या सदर प्रसंगी स्वतः विधानसभेतील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देश हितासाठी शपथ घेतली आहे, त्यांच्या समक्ष देश विरोधी घोषणाबाजी सुरू असताना कोणत्याही प्रकारची  देश विरोधी घोषणाबाजीला न थांबवता उलट पक्षी त्यांनी सदरच्या मोर्चामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

आमदार जितेंद्र आव्हाड हे स्वतः महाराष्ट्र विधानसभेतील सदस्य असून कधी ते विधानसभेच्या सत्रात गांजा, अमली पदार्थ घेऊन विधानसभेत जातात, कधी देश विरोधी कारवाया एन्काऊंटर केलेल्या इसरत जहा करता वक्तव्य करतात, कळवा मुंब्रा विधानसभेत दिल्ली बॉम्ब स्पोटातील आरोपी मुंबईत  सापडलात एक ना अनेक अशा देश विरोधी घटना सदर विधानसभेमध्ये वारंवार का घडतात? अमली पदार्थाच्या व्यापार तसेच वाढते गुन्हेगारी लक्षात घेता आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात देश विरोधी घोषणाबाजी मध्ये सहभाग असल्याच्या सर्व समक्ष दिसत आहे तरी त्यांच्यावरती त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा,

तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आम्ही अशी मागणी करत आहोत, की सदर आमदाराचे त्वरित निलंबन करण्यात यावे,

सदर मोर्चा आंदोलनात सहभागी झालेल्या एनसीपी पवार गटाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांवर देश विरोधी घोषणाबाजी केली, म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, तसेच त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी ठाणे तर्फे करण्यात येत आहे.

याप्रसंगी मनोहर सुगदरे, माजी सरचिटणीस ठाणे जिल्हा,
तेजस चंद्र मोरे, कलवा मंडळ अध्यक्ष कलवा पूर्व,
गजानन परब, प्रभा अध्यक्ष कलवा पूर्व,
मनोहर मोतीकर ,विस्तारक कलवा मंडल सरचिटणीस,
नाझिया तांबोले मुंब्रा कसा मंडळ अध्यक्षा,
ज्ञानेश्वर जमदाडे ,कामगार मोर्चा कलवा,
धनंजय परब ,अध्यक्ष युवा मोर्चा भारतीय मराठा महासंघ , रजनीकांत प्रजापति युवा मोर्चा,
देवांशू पांडे, युवा मोर्चा,
संदीप दुबे, युवा मोर्चा, हनुमंत शिंगारे ,युवा मोर्चा अध्यक्षा कलवा,
कुणाल पाटील मंडल अध्यक्ष मुंब्रा, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button