मुंबईत निवडणूक आयोग मतदार यादीच्या विरोधात मनसे व महाविकास आघाडीच्या विराट “सत्याचा मोर्चा”.
सत्याच्या मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती प्रमुख उपस्थिती राज ठाकरे उद्धव ठाकरे व शरद पवार.

कैलासराजे घरत
मुंबई प्रतिनिधी
मनसे आणि महाविकास आघाडीचा मुंबईत महाविराट “सत्याचा मोर्चा” संपन्न..!
“राज साहेब ठाकरेंनी पुराव्यांचा ढीगच लावला- खोट्या दुबार मतदार यादी वाचून दाखवून सगळ पितळ उघडं केलं”
संविधान वाचवा ! लोकशाही वाचवा!! खोट्या नाही, खऱ्या मतदारांची लढाई!!
निवडणुका या पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात आणि मतदार यादीतील गोंधळ दुरुस्त झालेच पाहिजेत याबद्दल आग्रही असणाऱ्या राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगा विरोधात मुंबईत, चर्चगेट येथे आज १ नोव्हेंबर २०२५ रोजी,’ सत्याचा मोर्चा’ काढला होता. यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना (उभाठा)पक्षप्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे साहेब, मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार, शेकाप चे जयंत पाटील आणि सर्व मान्यवर नेत्यांनी जमलेल्या नागरिकांना संबोधित केलं. मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे म्हणाले, आजचा मोर्चा हा राग व्यक्त करण्याचा, ताकद दाखवण्याचा, मुद्दा दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचा मोर्चा आहे. सत्ताधारी पक्षासह सर्वांना मतदारयादी विषयी तक्रार आहे तर निवडणुकांची घाई कुणासाठी?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कल्याण, मुरबाडचे साडेचार हजार मतदार तिकडेही मतदान करतात आणि मलबार हिलमध्येही मतदान करतात. असे महाराष्ट्रात लाखो लोकं असतील. हा फार मोठा विषय नाही, साधी गोष्ट आहे, मतदारयादी साफ करून पारदर्शक करा आणि त्यानंतरच निवडणूक घ्या. इव्हीएम मध्ये गडबड असल्याचं मी २०१७ पासून सांगतोय. २३० जागा जिंकूनही महाराष्ट्रात सन्नाटा होता, कारण विधानसभेला निवडून येणाऱ्यांची सोय आधीच झाली होती. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात १७,२९,४५६ पैकी ६२,३७० दुबार मतदार आहेत. पुणे लोकसभेत १७,१२,२४२ पैकी १,०२,००२ दुबार मतदार आहेत. हीच परिस्थिती राज्यातल्या इतर सर्व मतदारसंघात आहे. त्याचे आज मी पुरावे घेऊन आलो आहे. गेली पाच वर्षे निवडणूक घेतलेली नसताना मतदारयादी दुरुस्तीसाठी अजून काही दिवस गेले तर असं काय नुकसान होणार आहे? पण जी माणसं मतदारयादीत घुसवली आहेत त्यांचं काय? मतदार यादीतील अशा प्रकारचे घोळ ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आणि ही गोष्ट शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचली आहे. जेव्हा कधी निवडणुका होतील, तेव्हा दुबार तिबार मतदान करायला आलेल्या लोकांचा चांगला समाचार घेऊन मग त्यांना पोलिसांच्या हवाली करा. या महाविराट मोर्चात मनसे, शिवसेना(उबठा), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शेकाप आणि महाविकास आघाडीचे सर्व पक्षातील महत्वाचे नेते आणि पदाधिकारी मान्यवरांनी उपथितीत राहून हा मोर्चा यशस्वी झाला.√



