कलवा येथील अपर्णाराज सोसायटीत झालेला घोटाळ्याच्या विरोधात आंदोलन.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषण केले, त्यांना संभाजी ब्रिगेड व आम आदमी पार्टीने पाठिंबा दर्शविला.

प्रतिनिधी ठाणे,
उपनिबंधक, सहकारी संस्था, ठाणे शहर यांची व अपर्णाराज सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या ( सभासद संख्या ४३६ ) मागील ( सन २००६-२०२२ ) १७ वर्षांच्या दीर्घ कार्यकाळातील अनियमित व नियमबाह्यरित्या केलेल्या आर्थिक व्यवहारांबाबत तसेच माजी समिती सदस्यांच्या मालमत्तेची चौकशी करणे बाबत, व संस्थेच्या माजी व्यवस्थापकीय समितीच्या पदाधिकाऱ्यांची व समिती सदस्यांची Brain Mapping व Narco Test करून सदर बाबी सखोल चौकशी करणे बाबत तसेच माजी समितीने दिलेल्या बनावटी दप्तराची पाहणी व चौकशी करणे व नवीन छापलेल्या १०० शेअर सर्टिफिकेट पैकी वापरात न आलेली ८२ कोरी – निरंक शेअर सर्टिफिकेट्स व १८ शेअर सर्टिफिकेट्स च्या काउंटर फॉइल्स सह संस्थेचे संपूर्ण व मूळ दप्तर संस्थेला मिळवून देऊन संस्थेला न्याय मिळवून द्यावा.
अपर्णा राज को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी लिमिटेड च्या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड व आमआदमी पार्टी यांनी पाठिंबा दर्शविला.या प्रसंगी संभाजी ब्रिगेड ठाणे जिल्हाध्यक्ष शिवश्री,चंद्रशेखर पवार, आम आदमी पार्टी सहसचिव महाराष्ट्र राज्य सतीश सलुजा, आम आदमी पक्ष संघटक ठाणे जिल्हा संकेत वाडकर, संभाजी ब्रिगेड ठाणे जिल्हा मिडिया अध्यक्ष,राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ ठाणे जिल्हा अध्यक्ष, शिवश्री श्रवण पाटील, संभाजी ब्रिगेड कळवा विभाग प्रमुख अजय भोसले, संभाजी ब्रिगेड कळवा संघटक आदित्य दरेकर, यांनी उपस्थिती लावली.





