महाराष्ट्र

जी, पी, पारसिक बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय गोपीनाथ शिवराम पाटील यांच्या८६ वी जयंती कळवा मुख्य कार्यालय येथे उत्साहात साजरी.

जी, पी, पारसिक बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय गोपीनाथ शिवराम पाटील यांच्या ८६ वी जयंती निमित्त महा रक्तदान शिबिर आयोजित.

प्रतिनिधी ठाणे, श्रावण पाटील,

आज शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी जीपी पारसिक सहकारी बँक लि चे संस्थापक, अध्यक्ष आदरणीय स्व. गोपीनाथ शिवराम पाटील साहेब यांच्या 86 व्या जयंती निमित्त जीपी पारसिक बँक कर्मचारी व अधिकारी संघटना व जीपी पारसिक सहकारी बँक लि.यांचे संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर बँकेचे मुख्य कार्यालय, पारसिक नगर कळवा, ठाणे येथे आयोजित करण्यात आले.
तसेच आरोग्य तपासणी चे ही आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय गोपीनाथ पाटील साहेबांच्या पुतळ्या ला बँकेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक व BOM चे अध्यक्ष श्री.रणजित पाटील साहेब यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

या प्रसंगी मा.अध्यक्ष, विद्यमान संचालक, BOM चे अध्यक्ष श्री. रणजित पाटील साहेब व उपाध्यक्ष श्री प्रकाशजी पाटील, संचालक श्री रमाकांत लाहोटी साहेब,श्री. कय्युम चेउलकर साहेब, श्री. नवनाथ पाटील यांचे हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.

या कार्यक्रमाला संचालक बोर्ड ऑफ मॅनॅजमेण्ट चे श्री. सुरेश भोईर व श्री. प्रदीप म्हात्रे साहेब यांची ही उपस्थिती होती.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री.विजय भोसले साहेब व जनरल मॅनेजर श्री. राजीव माईणकर साहेब हे वरिष्ठ अधिकारी ही हजर होते.
तसेच यूनियन चे माजी अध्यक्ष, AGM श्री. दीनानाथ म्हात्रे साहेब उपस्थित होते.

सदर कार्यक्रमा साठी यूनियन चे अध्यक्ष श्री.भारत माळी, उपाध्यक्ष श्री. मनोज पाटील,जनरल सेक्रेटरी श्री. नरेंद्र काळे आणि यूनियन चे पदाधिकारी श्री. अनिल डांगळे, श्री सुशांत दोडके आणि सौं आरती ठाकूर यांनी विशेष परिश्रम घेतले.

बँक प्रशासना तील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि सर्व कर्मचारी बंधु भगिनी तसेच माजी कर्मचारी /अधिकारी यांनी उपस्थित राहून जयंती व रक्तदानाच्या कार्यात उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला.

कर्मचारी बंधु भगिनींनी रक्तदान करून आदरणीय साहेबांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button