भारतीय जनता पार्टीच्या बिहारमध्ये ऐतिहासिक विजय.
कळवा पूर्व येथे भारतीय जनता पार्टीचे उत्तर भारतीय ठाणे जिल्हा सचिव एडवोकेट दिनानाथ पांडे यांच्याकडून भव्य रॅली व लाडू वाटप.

प्रतिनिधी ठाणे,
भारतीय जनता पार्टीचा बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भारतीय जनता पार्टीचे उत्तर भारतीय ठाणे जिल्हा सचिव, एडवोकेट दिनानाथ पांडे व अँड,स्वप्ना पांडे यांनी कलवा भास्कर नगर येथे, भव्य रॅली काढून नागरिकांना लाडू वाटप केले, या भव्य दिव्य रॅलीत भास्कर नगर येथे महिला व पुरुषांनी हजारोच्या संख्येने उपस्थिती लावली, व जय श्रीराम, हर हर मोदी, घर घर मोदी ,अशा घोषणा देत रॅलीत उपस्थिती लावली,
- माध्यमांशी बोलताना एडवोकेट दिनानाथ पांडे यांनी, बिहारमध्ये झालेल्या विजयाचे कौतुक केले, व बिहारमधील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या, व त्यांचे कौतुक केले, कारण बिहारमध्ये झालेला हा ऐतिहासिक विजय हा नितीश बाबू व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यश आहे, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, तसेच ठाणे महानगरपालिकेची निवडणूक लागणार आहे ,

कळवावाशियांना त्यांनी विनंती केली, व सांगितले की आपकी बार बारासो पार, असे नारा देत त्यांनी रॅलीचे नेतृत्व केले, उत्तर भारतीयांना आज या कडव्यामध्ये 40 वर्षे होत आले, परंतु असा कोणताही नेता त्यांच्या पाठीमागे उभा राहिलेला नाही, म्हणून त्यांनी विनंती केली की तुम्ही माझ्या पाठीमागे उभे रहा व मला आशीर्वाद द्या, व गद्दारांच्या लालसेला बळी न पडता मला मतदान करा, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या अशी विनंती केली. बिहारमध्ये जसे परिवर्तन झाले तसेच कलवा मध्ये परिवर्तन करा अशी त्यांनी मागणी केली.




