रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची महाराष्ट्र कार्यकारणी जाहीर,
अध्यक्षपदी जकप्पा कांबळे यांची निवड.

प्रतिनिधी, ठाणे,
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर,
अध्यक्षपदी जक्कप्पा कांबळे यांची निवड,
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( रिपाई )ची बैठक नुकतीच गुरुवारी दिनांक १५ ऑक्टोंबर २०२५ रोजी रिपाईचे डॉ, राजेंद्र गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत छेडा आर्किट ठाणे येथे संपन्न झाली, सदर सभेमध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश सहचिटणीस,इत्यादी पदावर कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली,
रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी जकप्पा कांबळे, यांची रिपाई चे महाराष्ट्र प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी डॉ, गौतम गोसावी यांनी डॉ, राजेंद्र गवई, यांच्या मार्गदर्शनानुसार बिनविरोध निवडून घोषित केली, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी विजय पंडित, श्रीकांत सावंत, गोकुळ पांडे, दीपक पाटील, बबनराव शिंदे, पंडित टोमके, यांची निवड जाहीर केली,
महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी मधुकर मांजसकर, वसंतराव गवई,भाऊसाहेब डोंगरे, अर्जुनराव खंडारे, रमेश शिवचरण, किशोर वाघमारे यांची निवड जाहीर झाली, तर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी मारुती सोनवणे, गोपाळ रायपुरे ,अशोक उमरे व संघराज बिराजदार यांची निवड घोषित झाली,
निवड झालेले पदाधिकारी यांचे डॉ,राजेंद्र गवळी यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले, यावेळी राजेंद्र गवई यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले,
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई प्रदेश अध्यक्ष आनंद खरात, डॉ,तेजस्विनी गौतम गोसावी, रिपाईचे ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वाघमारे, मुंबई प्रदेश खजिनदार संजय थोरात, सातारा प्रतिनिधी हेमंत भोसले ,भास्कर केदारे ,शशिकांत रसाळ, नेताजी कांबळे ,अनिल रोकडे, राजेंद्र जाधव ,प्रमोद वाघमारे, बाळाबाई मिटकर ,जयराम मोरे, श्रावण पाटील, हिरादास सोनवणे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.



