महात्मा गांधी तंटा मुक्ती समिती खारपाडा यांचा वतीने महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
पेण तालुक्यातील खारपाडा येथे महात्मा गांधी तंटा मुक्ती समिती यांच्या वतीने शिवराज मित्र मंडळ वाचनालयात महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

रायगड जिल्हा प्रतिनिधी, कैलासराजे घरत,
महात्मा गांधी तंटामुक्ती समिती दुष्मी-खारपाडा यांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी..!
पेण तालुक्यातील महात्मा गांधी तंटामुक्ती समिती दुष्मी-खारपाडा यांच्या वतीने खारपाडा गावात शिवराज मित्र मंडळ वाचनालयात
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन महात्मा गांधी तंटामुक्ती समिती दुष्मी-खारपाडा अध्यक्ष श्री.हनुमान बाबू घरत यांनी केले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.पी.पी मोरे यांच्या शुभहस्ते शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.विद्यमान सरपंच सौ.नेत्रा महेंद्र घरत यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महात्मा गांधी तंटामुक्ती समिती दुष्मी-खारपाडा अध्यक्ष श्री.हनुमान बाबू घरत यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महात्मा गांधी तंटामुक्ती समिती दुष्मी-खारपाडा सदस्य पत्रकार कैलासराजे घरत यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत करून प्रास्ताविक मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य श्री.प्रशांत बाळकृष्ण घरत, समाजसेवक महेंद्र घरत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महात्मा गांधी तंटामुक्ती समिती दुष्मी-खारपाडा अध्यक्ष श्री.हनुमान बाबू घरत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की आपण सर्वांनी मिळून सर्वप्रथम तंटा होणार नाही याची काळजी घ्या आणि एखादा तंटा, वादविवाद झाल्यास त्याचे मूळ शोधून तो गाव पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न करूया. जेणेकरुन मानसिक आणि आर्थिक नुकसान होणार याची दक्षता घेवू या. गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि शांततेच्या मार्गावर आपण सर्वांनी चालू या.
या कार्यक्रमास माजी उपसरपंच श्री.परशुराम गोविंद घरत, माजी उपसरपंच संजय मंगळ्या घरत, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री.अशोक मंग्या पाटील, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री.हिरामण गोविंद घरत, विनायक कोळी, तंटामुक्ती सदस्य श्री.देवदत्त घरत, श्री.कांतीलाल घरत, श्री.नितीन घरत आमचे मार्गदर्शक अण्णासाहेब श्री.कमलाकर बाबू घरत, श्री.देविदास घरत, श्री.अनिल घरत, जेष्ठ शिवसैनिक तुकाराम म्हात्रे, जेष्ठ शिवसैनिक तुकाराम घरत, कृष्णा घरत आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक तथा ज्येष्ठ समाजसेवक जी.जी.पारीख यांचे आज पहाटे पाच वाजता निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



