महाराष्ट्र

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दौड मॅरेथॉनचे आयोजन.

ठाणे भारतीय जनता पार्टी कडून कलवा छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती पासून खारेगाव दत्तवाडी पर्यंत राष्ट्रीय एकता दौड मॅरेथॉनचे आयोजन.

प्रतिनिधी ठाणे,

शुक्रवार,३१/१०/२०२५.

*लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौड मॅरेथॉनचे आयोजन.*

  1. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त, ठाणे भारतीय जनता पार्टीचे कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार, ऍडव्होकेट,निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली, ठाणे कळवा छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती पासून, खारेगाव पर्यंत राष्ट्रीय एकता दौड मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले, आमदार एडवोकेट निरंजन डावखरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, यांच्या मूर्तीला अभिवादन करून,पुष्पगुच्छ अर्पण करून ,या राष्ट्रीय एकता दौड मॅरेथॉनची कलवा नाका येथून सुरुवात करण्यात आली, या मॅरेथॉन स्पर्धेत ठाण्यातील वेगवेगळे शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी भाग घेतला, त्याच प्रमाणे भारतीय जनता पार्टीचे, कार्यकर्ते पदाधिकारी व महिला आघाडी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली,या रॅलीत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाच्या जयघोष करण्यात आला, भारत मातेच्या जय जय कार करत रॅली खारेगावच्या दिशेने निघाली, या राष्ट्रीय एकता दौड मॅरेथॉन रॅलीचा समारोप खारेगाव दत्तवाडी येथे राष्ट्रीय गीताने करण्यात आला, याप्रसंगी आमदार एडवोकेट निरंजन डावखरे, विक्रम भोईर ,(सरचिटणीस भारतीय जनता पार्टी ठाणे शहर) अशोक भोईर, (उपमहापौर ठाणे महानगरपालिका) हर्षला बुबेरा ( प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी) मनोहर सुगदरे, राजन पाटील, प्रशांत तळवडे, नीता पाटील ,कृष्णा यादव, तेजस चंद्र मोरे, लक्ष्मीकांत यादव ,प्रशांत पवार, जगदीश गौरी, सुदर्शन साळवी, दीपिका क्षीरसागर ,अरविंद कलवार ,उषा पाटील, दिनानाथ पांडे, श्रीकांत ठोसर, मंजीत जाधव ,किरण पाटील, प्रवीण महाडिक , कोमल जिथेकर,आनंद पाटील, कमलाकर वरवडे ,नरेश पवार, सुरेश शेवाळे, नजीया तांबोळी, सुजित गुप्ता ,अनिल भगत ,कोमल जितेकर, व भाजपाचे कळवा मुंब्रा विधानसभा व ठाणे शहराचे इतर असंख्य कार्यकर्ते, परिसरातील धावपटू लहान मुले विद्यार्थी ,सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.Ī

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button