संघर्ष योद्धा मराठा आंदोलक मा, मनोज जरांगे पाटील यांना बिनशर्त पाठिंबा.
शेतकरी संघटना, शेतकरी पुत्र, शिवश्री, राज पाटील यांचे संघर्ष योद्धा मराठा आंदोलक मा, मनोज जरांगे पाटील यांना पाच दिवस मुंबई आझाद मैदानावर समर्थन..

प्रतिनिधी, मुंबई,
*शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य कोकण विभागीय अध्यक्ष, शेतकरी पुत्र,शिवश्री.राज पाटील,*
भिवंडीतील शेतकरी पुत्र मा, शिवश्री, राज पाटील यांनी आझाद मैदानावर,पाच दिवस संघर्ष योद्धा मराठा आंदोलक मा, मनोज जरांगे पाटील यांना आपल्या कार्यकर्त्यांबरोबर बिनशर्त पाठिंबा दिला, तसेच परिवाराला सांगितले की माझ्या गोरगरीब मराठा बांधवांना, जो पर्यन्त आरक्षण मिळत नाही तो पर्यन्त मी स्वस्थ बसणार नाही, व घरी परतणार नाही, त्यांची जिद्द आंदोलनकर्ता जरांगे पाटील यांच्या सारखीच होती, मनोज जरांगे पाटील यांची ही जिद्द हीच होती, जो पर्यन्त मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तो पर्यन्त मी मुंबई सोडणार नाही, व आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, शेवटी महाराष्ट्र सरकार दादांच्या समोर झुकले,मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना दिलेला शब्द पूर्ण केला, महाराष्ट्राची कॅबिनेट उपसमितीचे अध्यक्ष मा, मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणाचा जी, आर, दिला ,व दादांचे लिंबू सरबत पिऊन उपोषण सोडले, भिवंडीतील कट्टर समर्थक श्री, शिवश्री,राज पाटील आझाद मैदानावर पाच दिवस ठाण मांडून बसले होते,मनोज जरांगे पाटील यांना जी, आर, मिळाला तेव्हा सार्थकांनी सुटकेचा श्वास सोडला, आझाद मैदानावर विजयाची गुलाल उधळून आनंद साजरा करण्यात आला,दादांनी समर्थकांना आदेश दिले आत्ता मुंबई सोडा आपापल्या घरी गावाला सुखरूप जावे असे आवाहन केले, त्या नंतर समर्थक परतीच्या प्रवाशाला निघाले, मराठा समाजाने गावागावात गुलाल उधळून फटाके फोडून उत्सव साजरा केला,, संघर्ष योद्धा मराठा आंदोलक मा, मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानले.. एक मराठा लाख मराठा.🚩🚩🚩🚩





