महाराष्ट्र

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची एम, पी, मध्ये कार्यालयाचे उद्घाटन..

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची राज्य कार्यकारणी जाहीर..

महाराष्ट्र वाहतूक सेवा समिती, मा, श्रावण पाटील यांची महाराष्ट्र अध्यक्ष पदी नियुक्ती जाहीर…

*राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या मध्यप्रदेश कार्यालयाचे भव्य उद्घाटन*

छिंदवाडा –
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या मध्यप्रदेश राज्यातील कार्यालयाचे उद्घाटन संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते छिंदवाडा येथे संपन्न झाले. या प्रसंगी राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अंडागळे, राष्ट्रीय संघटक निलेश ठाकरे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सागर खोबरागडे, विदर्भ अध्यक्ष मनोज मोडक, विदर्भ उपाध्यक्ष प्रणित भगत, मध्यप्रदेश अध्यक्ष प्रदीपकुमार जुलमे यांच्यासह छिंदवाडा येथील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रदीपकुमार जुलमे यांनी माहिती देताना सांगितले की, मध्यप्रदेशात एकूण ५५ जिल्हे असून त्यापैकी शिवणी, भोपाळ, इंदूर व छिंदवाडा या चार जिल्ह्यांमध्ये संघाची कार्यकारिणी कार्यरत आहे. पुढील काही दिवसांत १० ते १५ जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संघटनात्मक बांधणीसाठी घेतलेल्या निर्णयांमध्ये विदर्भ विभागीय अध्यक्षपदी ,मनोज मोडक, महाराष्ट्र वाहतूक सेवा समिती ,महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी, श्रावण पाटील तर पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी, मारुती जाधव यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. संघटना पुढे नेण्यासाठी सक्रीय पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी दिली जाणार असल्याचे यावेळी ठळकपणे सांगण्यात आले.

या सोहळ्यात राष्ट्रीय संपर्कप्रमुख प्रितमसिंग चौहान, राष्ट्रीय प्रवक्ता मारुती जाधव, प्रसिद्धीप्रमुख श्रावण पाटील आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच ठाणे, रायगड, मुंबई व पुणे येथील मान्यवर पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button