राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा, विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्या घराच्या गणपती बाप्पा चे दर्शन..
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ मुंबई विभागीय पदाधिकारी यांनी संस्थापक अध्यक्ष मा, विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्या घराच्या गणपती चे दर्शन घेतले.

प्रतिनिधी पनवेल…
*मुंबई विभागीय पदाधिकाऱ्यांकडून संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन*
पनवेल प्रतिनिधी : आज दिनांक १ सप्टेंबर २०२५
मुंबई :
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित अन्याय अत्याचार निवारण समितीच्या मुंबई विभागीय पदाधिकाऱ्यांनी संस्थापक अध्यक्ष *विजय सूर्यवंशी* यांच्या निवासस्थानी भेट देऊन घरच्या बाप्पाचे दर्शन घेतले. दर्शनावेळी बाप्पाच्या चरणी साष्टांग नमस्कार घालून समाजहित, संघटन बळकटी आणि लोककल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली.
या वेळी संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आढांगळे यांनी गणेशोत्सवाचे सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट करत संघटन कार्याबाबत सविस्तर माहिती दिली. तर राष्ट्रीय संपर्कप्रमुख झुंबरसिंग पाटील यांनी संघात निष्ठावंत कार्यकर्त्यांना सदैव सन्मान मिळतो, असे सांगत कार्यकर्त्यांच्या योगदानाचे महत्व अधोरेखित केले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनीही थोडक्यात आपला परिचय देत संघटन उभारणीच्या वाटचालीचा आढावा उपस्थितांसमोर ठेवला.
या विशेष प्रसंगी मुंबई सचिव लक्ष्मण रामा साळवे, कुर्ला अध्यक्ष गौतम सोपान सदाफुले, कुर्ला सचिव धनाजी लिंबाजी कोकणे, नवी मुंबई उपाध्यक्ष ज्योतिराम धनाजी कोकणे तसेच सामाजिक कार्यकर्ते अविनाश नरसिंग खरटमोल यांची उपस्थिती होती.
या भेटीत सर्व पदाधिकाऱ्यांनी समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि अन्याय-अत्याचाराविरुद्ध लढा अधिक प्रभावीपणे देण्यासाठी पुढील कार्ययोजना आखण्याचा निर्धार व्यक्त केला. समितीच्या कार्यातून समाजात बंधुता, श्रद्धा आणि सेवाभाव दृढ होत असल्याने आगामी काळात या कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.




