पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर..
नाशिक त्र्यंबकेश्वर परिसरात पत्रकारांवर झालेल्या अमानुष हल्ल्याचा निषेध, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ..

*पत्रकारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर*
ठाणे (प्रतिनिधी) : नाशिक येथील त्र्यंबकेश्वर परिसरात पत्रकारांवर झालेल्या अमानुष हल्ल्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मा. श्रावण पाटील, उपाध्यक्ष हिरादास सोनावले तसेच अन्याय अत्याचार निवारण समितीचे ठाणे जिल्हाध्यक्ष राजेश चव्हाण यांनी ठाणे जिल्हा उपजिल्हाधिकारी संदीप माने यांना निवेदन सादर केले.
यावेळी पत्रकारांवर होणारे वारंवार हल्ले लोकशाहीसाठी गंभीर आव्हान असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. पत्रकार हा जनतेचा आवाज असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनाद्वारे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, जर पत्रकारांवर होत असलेले हल्ले थांबवण्यासाठी तातडीची आणि कडक कारवाई करण्यात आली नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल. शासनाने दोषींवर कठोर शिक्षा करून भविष्यातील घटना टाळाव्यात, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.
पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ असून त्यांच्यावर होत असलेले हल्ले लोकशाहीवरील हल्ला आहे, असे मत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. यावेळी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ असून त्यांच्यावर होत असलेले हल्ले लोकशाहीवरील हल्ला आहे, असे मत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. यावेळी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.



