मध्यप्रदेश येथे राष्ट्रीय प्रागामी पत्रकार संघाचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन.
मा, मारुती जाधव यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी नियुक्ती जाहीर.

*मारुती जाधव यांची पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी निवड*
छिंदवाडा (प्रतिनिधी) –
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या मध्यप्रदेशातील संपर्क कार्यालयाच्या भव्य उद्घाटन सोहळ्यात संघटनेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. शिवधर्म वृत्तपत्राचे पुणे जिल्हा संपादक मारुती जाधव यांची पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष म्हणून गौरवपूर्ण नियुक्ती करण्यात आली.
संघटनेसाठी सातत्यपूर्ण योगदान
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. विजय सूर्यवंशी आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. बाळासाहेब अडांगळे यांच्या हस्ते ही घोषणा करण्यात आली. आतापर्यंत कार्याध्यक्ष पद भूषवणाऱ्या जाधव यांच्या कार्यकुशलतेची आणि संघटनेसाठी असलेल्या तळमळीची दखल घेत त्यांना थेट विभागीय अध्यक्षपदी नेमण्यात आले आहे.
तन-मन-धनाने तत्पर
पत्रकार बांधवांच्या प्रश्नांबाबत सतत सकारात्मक चर्चा, संघटनेच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन आणि संघटनेसाठी तन-मन-धनाने नेहमी तत्पर असणे हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील संघटनात्मक कामकाज त्यांच्या नेतृत्वाखाली नवे बळ घेईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
जिल्हानिहाय संघटनात्मक बांधणीची ग्वाही
नव्या जबाबदारीनंतर लवकरच पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांवर कार्यक्षम जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली जाईल अशी ग्वाही जाधव यांनी दिली आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.




