महाराष्ट्र

ठाणे, साकेत खारेगाव मुंबई नाशिक रोडवर खड्यांचे साम्राज्य.

ठेकेदाराचा मनमानी कारभार नागरिक त्रस्त वाहतूक कर्मचारी यांचे शर्थीचे प्रयत्न.

ठाणे, प्रतिनिधी, न्युज 04 महाराष्ट्र, तरुण गर्जना वृत्तसेवा,

साकेत खारेगाव मुंबई नाशिक रोडवर खड्यांचे साम्राज्य, रस्त्यावर काम करणारा ठेकेदार ,मातीने खड्डे बुजवून नागरिकांच्या जीवाशी खेळ करतांना, न्युज 04 महाराष्ट्र मीडियाच्या कॅमेरेत कैद, ठेकेदाराच्या निष्काळजी मुळे नागरिकांना व वाहतूकदारांना खड्ड्यातून रस्ता काढतांना आम्ही टिपलेले चित्र, खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे वाहतूक कर्मचारी यांचे शर्थीचे प्रयत्न, स्वतः वाहतूक कर्मचारी रस्त्यावर माती टाकून खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत करतांना, आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत, नागरिकांची व वाहतूकदारांची याच्यातून कधी सुटका होईल, असे नागरिकांकरून प्रतिक्रिया देण्यात आली, ठेकेदार सरकारची खोटी बिल देऊन दिशाभूल करत आहे असे समजते,माती टाकून डांबर व केमिकल ची बिल पास करून, आपला फायदा करून घेतांना दिसत आहे, हा रस्ता एम एम आर डी, किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग, यांच्या अंतर्गत येतो, तरी सरकारने या ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे नागरिकांकडून दबक्या आवाजात सांगण्यात येते ,

  1. #तरुणगर्जनावृत्तसेवा #न्युज04महाराष्ट्र #ठाणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button