महाराष्ट्र

सोमनाथ ज्योतिर्लिंग अभिमंत्रित रुद्राक्ष विनामुल्य मिळवा.

जनसुराज्य वेल्फेअर ट्रस्ट तर्फे आरण्येश्वर महादेव मंदिरात श्रावण सोमवार निमित्त वाटप .

प्रतिनिधी , ठाणे, श्रावण पाटील,

सोमनाथ ज्योतीर्लिंग अभिमंत्रित पंचमुखी रुद्राक्ष मिळवा विनामुल्य
¹*जनस्वराज्य वेल्फेअर ट्रस्टतर्फे अरण्येश्वर महादेव मंदिरात श्रावणी सोमवारी वाटप*

ठाणे,ता.१८, सोमवार, (प्रतिनिधी) ठाणे, श्रावण पाटील,
श्रावणी सोमवार निमित्त १८ ऑगस्ट रोजी कळवा खारेगाव येथील अरण्येश्वर महादेव मंदिरात जनस्वराज्य वेल्फेअर ट्रस्ट आणि भाजप परिवाराच्या वतीने सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे पवित्र आशीर्वाद लाभलेले व शास्त्रशुद्ध मंत्रोच्चाराने अभिमंत्रित पंचमुखी रुद्राक्षाचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. सकाळी ९ ते १२ या कालावधीत होणाऱ्या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून आमदार संजय केळकर,आ. निरंजन डावखरे आणि भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले, ज्येष्ठ नेते संजय वाघुले आणि कोकण पदवीधर प्रकोष्ठचे संयोजक सचिन मोरे उपस्थित राहणार आहेत.
भगवान शिवाचे प्रथम ज्योतिर्लिंग सोमनाथ मंदिर हे हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र स्थळ आहे. याच पवित्र स्थळावरून अभिमंत्रित करुन आणलेले पंचमुखी रुद्राक्ष, जे पंचदेव व पंचमहाभूतांचे प्रतीक आहेत, मानसिक शांती, आरोग्य, समृद्धी व नकारात्मकतेपासून संरक्षण देतात. जनस्वराज्य वेल्फेअर ट्रस्टतर्फे कळवा खारेगांव येथील जुना मुंबई – पुणे रोडवरील प्रेमनगर सोसायटी समोर,अरण्येश्वर महादेव मंदिर येथे अभिमंत्रित पंचमुखी रुद्राक्षाचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या पवित्र सेवेत सहभागी व्हावे, असे आवाहन निमंत्रक जनस्वराज्य वेल्फेअर ट्रस्ट व भाजपा परिवार, कळवा यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button