श्री संत सावता माळी यांच्या चौदावी पुण्यतिथि निमित्त कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित.
सावरकर नगर ठाणे आईमाता मंदिर येथे माळी समाजाच्या वतीने कीर्तन कार्यक्रम संपन्न.

*श्री संत शिरोमणी सावता माळी यांच्या चौदावी पुण्यतिथि निमित्त कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न* ,सावता माळी समाज सेवा मंडळ ठाणे आयोजित , सावरकर नगर आईमाता मंदिर येथे माळी समाजाच्या वतीने कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, या कार्यक्रमाला सावता माळी समाज मंडळाचे अध्यक्ष मा, संजय छगन माळी, उपाध्यक्ष मा, प्रवीण संभाजी माळी, सचिव मा, धनराज महाजन व माळी समाजाचे समाज बांधव व महिला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, या कार्यक्रमात सूत्र संचालन करतांना मा, अध्यक्ष संजय छगन माळी यांनी आपल्या समाजाला एकत्रित राहण्याचे आवाहन केले, व समाजातील तरुण व तरुणींना आश्र्वासित केले, समाजातील विद्यार्थ्यांनी महानगर पालिका व राज्य सेवा व लोकसेवा इतर कोणत्याही प्रकारच्या परीक्षा देण्याकरिता मी सर्वोतोपरी मदत करीन,त्यांना मार्गदर्शन करीन, त्यांना अभ्यासासाठी लागणारी पुस्तके उपलब्ध करून देईन , असे बोलतांना माळी समाजाच्या भवितव्यासाठी मी प्रयत्न करीत राहीन असे आश्र्वासित करतो, या प्रसंगी अध्यक्ष मा संजय छगन माळी यांनी आपल्या समाजाच्या कार्यालयासाठी ११११११ रुपये देणगी जाहीर केली.




