शिवधर्म वृत्तसेवा व पुरोगामी पत्रकार संघाकडून स्वातंत्रदिवसानित्त जलेबी वाटप.
कोल्हापूर उस्ताद ग्रुप व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची पंधरा ऑगस्ट निमित्त जलेबी वाटप.

शिवधर्म न्यूज कोल्हापूर :१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथे वस्ताद ग्रुप व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघातर्फे जिलेबी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य प्र अध्यक्ष दत्ता पाटील वस्ताद), कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सतीश चव्हाण, पोलीस मित्र संघटना अध्यक्ष प्रशांत पाटील, क्रीडा शहाजी गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पाटील, विघ्नहर्ता डेव्हलपर्सचे युवा नेते संतोष जाधव, राजू घोरपडे, विशाल पाटील आणि जयदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि देशभक्तीपर विचार व्यक्त केले. तसेच, नागरिकांना जिलेबी वाटप करून स्वातंत्र्यदिनाचा आनंद साजरा करण्यात आला. अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून वस्ताद ग्रुप व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाने समाजात एक चांगला संदेश दिला आहे.





