राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा, विजयजी सूर्यवंशी यांची दयाने मराठी शाळेला भेट.
माझी विद्यार्थी विजयजी सूर्यवंशी यांनी आपल्या दयाने गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली.

*माजी विद्यार्थी विजय सूर्यवंशी यांची द्याने जिल्हा परिषद मराठी शाळेला भेट* ✍️
आज दिनांक २५ ऑगस्ट रोजी द्याने येथील जिल्हा परिषद मराठी शाळेला त्या शाळेचेच माजी विद्यार्थी व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष . विजय सूर्यवंशी यांनी भेट दिली.
भेटीदरम्यान शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना तळमळीने शिकवताना पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. जुन्या आठवणींनी ते भावुक झाले. त्यांनी आपल्या शाळेतील शिक्षकांबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त केली.
. सूर्यवंशी म्हणाले,
“मी या शाळेत शिकत असताना उत्तम शिंदे गुरुजी, दिवाकर मॅडम, अहिरे मॅडम, शिंदे मॅडम, चाचट मॅडम यांच्याकडून मिळालेलं शिक्षण आयुष्यभर उपयोगी पडलं. आजच्या शिक्षकांनी शाळेचा केलेला कायापालट खरोखर कौतुकास्पद आहे. शिक्षणमंत्री दादाजी भुसे साहेबांनी या शाळेला आदर्श शाळा म्हणून घोषित करावे. मुख्याध्यापक प्रदीप सूर्यवंशी, भीमराव मगरे सर आणि महिला शिक्षिका यांनी घेतलेल्या परिश्रमांना शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळावा यासाठी आम्ही पत्रकार संघाच्या वतीने शिफारस करू.”
या वेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल हे देखील विशेष उपस्थित होते.
भेटीच्या वेळी
मुख्याध्यापक प्रदीप सूर्यवंशी,
विस्तार अधिकारी सौ. वैष्णवी मॅडम,
उपक्रमशील शिक्षक श्री. भीमराव मगरे,
शिक्षिका कौमुदी पाटील मॅडम व जयश्री शिंदे मॅडम उपस्थित होते.
ग्रामस्थांनाही आवाहन करण्यात आले की,
“गावाची मराठी शाळा वाचली तरच आपली मराठी भाषा वाचेल. म्हणून शिक्षकांच्या पाठीशी ठाम उभे राहिले पाहिजे.”
विद्यार्थी इंग्रजी-मराठी उत्तम पद्धतीने वाचताना दिसले. शाळेत “माझा गाव – माझी शाळा” ही संकल्पना यशस्वीरित्या राबवली जात आहे.
*राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ द्याने गावातील मराठी शाळेसोबत*✍🏻




