महाराष्ट्र

म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे राखी विथ खाकी चा कार्यक्रम उत्साहात साजरा.

कर्तव्य दक्ष पोलीस मित्र नाशिक पाऊंडेशन .

प्रतिनिधी,नाशिक,

प्रकाश आंबड,,

 म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे राखी विथ खाकी चा कार्यक्रम साजरा…
दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन नाशिक तर्फे, कोणताही सण असो वा उत्सव असो सदैव कार्यासाठी तत्पर असणारे,म्हसरूळ पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अंकुश चिंतामण तसेच डी वाय एस पी श्रीमती संगीता निकम मॅडम, तसेच इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना रक्षाबंधन निमित्त कृतज्ञता व्यक्त करून राखी बांधण्यात आली त्याप्रसंगी सर्व उपस्थित सर्व पोलीस मित्रांना म्हसरूळ पोलीस स्टेशन तर्फे नाश्ता आणि चहा देण्यात आला.
तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अंकुश चिंतामण साहेबांचे मार्गदर्शनही आम्हास लाभले, बऱ्याच विषयांवर चर्चा करण्यात आली,अशाप्रकारे अतिशय आनंदात ,खेळीमेळीच्या वातावरणात आणि उत्साहात आजचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रयत्न आणि नियोजन सौ सविता कुलकर्णी आणि प्रिया कुंभार मॅडम यांनी केले होते.
कार्यक्रम प्रसंगी ॲड सौ कामिनी भानुवंशे, रूपाली तांबारे प्रिया कुंभार, सविता कुलकर्णी, मंजुषा जाखडी , शितल चंद्रात्रे, वर्षा राजपूत, जयश्री दुर्गुडे, वैशाली जगताप, श्री शेखर ढेपे ,श्री सनील पगारे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button