“मी पाहिलेला ठाण्यातील अवलिया”श्री, अनिल भाऊ चौधरी.
"पुत्र व्हावा ऐसा गुंडां त्याच्या तिन्ही लोकी झेंडा "

प्रतिनिधी ठाणे,
*मी पाहिलेला ठाण्याचा खान्देशी*अवलिया* *श्री अनिल भाऊ चौधरी*
*” पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा “*
यात मी श्री. अनिल भाऊ चौधरी यांना बघतोय.
कोण,कुठला, खान्देशातून,एका खेड्या गावातुन, एका ड्रेस निशी आलेला, अवलिया ठाण्यात येतो काय ? कष्टाने राबराब राबतो काय? कुठे राहतो, कुठे खातो, कुठे पितो ? कोणाला ही कल्पना नसते. आणि ४० /४५ वर्ष तब्बल कष्ट करून आज ठाण्याच्या शिरपेचात तुरा रोवणारा, ठाण्यातील समस्त खान्देशवाशी यांच्या हृदयावर राज्य करणारा, हो हो तोच तोच नाही तेच माननीय,सन्माननीय *श्री. अनिलराव लीलाबाई हरी चौधरी* ठाण्यातील खान्देश वाशीयांच्या हृदयावर अविरहित राज्य करणारा, डॉक्टर इंजिनियर्स, मॅनेजर्स, नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार, मिनिस्टर,यांना लीलया भेटणारा अवलिया. असे श्रेष्ठ व ज्येष्ठ नेतृत्व हसतमुख मनमिळाऊ साध्या भोड्या स्वभावाचे रात्री बेरात्री नागरिकांना सामोरे जाणारे, व नागरिकांसाठी २४ तास राबराब राबणारे, हक्काचा माणूस म्हणून मी *”अवलिया”* म्हणतो यात काही वावगे तर नाही ना मित्रांनो..




