कळवा पोलीस स्टेशन, ठाणे येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची उल्लेखनीय कामगिरी.
तांत्रिक माहितीच्या आधारे कळवा पोलीस स्टेशन येथील प्रॉपर्टी मिसिंग मधीलमोबाईल फोनची उकल करण्यात पोलिसांना यश.

प्रतिनिधी ठाणे. श्रावण पाटील.
**कळवा पोलीस स्टेशन, ठाणे येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची उल्लेखनीय कामगिरी, तांत्रिक माहितीच्या आधारे कळवा पोलीस स्टेशन येथील प्रॉपर्टी मिसिंग मधील मोबाईल फोनची उकल करण्यात पोलिसांना यश**. 
*कळवा पोलीस स्टेशन परिसरात सन २०२४ ते २०२५ या वर्षात विविध कंपनीचे मोबाईल फोन हरवले असून त्याबाबत कळवा पोलीस ठाण्यात प्रॉपर्टी मिसिंगबाबत नोंदणी करण्यात आलेले आहेत.
सदर प्रॉपर्टी मिशिंगच्या अनुषंगाने श्री अशोक उत्तेकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तसेच अनिल गायकवाड पोलीस निरीक्षक,( गुन्हे )विठ्ठल नावडे पोलीस निरीक्षक,( प्रशासन) यांनी प्रॉपर्टी मिशिंग प्रकरणाचे तपासाबाबत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सह पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धोंडे, सह पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे, व तपास पथक स्ट्रोक यांना मार्गदर्शन करून सूचना केल्या होत्या.
त्या अनुषंगाने कळवा पोलीस स्टेशन येथे दाखल प्रॉपर्टी मिसिंग मधील मोबाईल फोन बाबत सविस्तर माहिती पोलीस शिपाई /८०६६ प्रशांत लवटे, पोलीस शिपाई /२४०१ महादेव हजारे व पोलीस शिपाई /१८५४ सुरेश रेपाळे यांनी CEIR या पोर्टलमध्ये भरून, त्यानुसार तांत्रिक पद्धतीने बारकाईने विश्लेषण करूनतसेच हरवलेल्या मोबाईल फोनचे सध्याचे वापर करते ,यांच्या पत्याबाबत कौशल्यपूर्ण माहिती प्राप्त करून ,सदर पत्या बाबत शहानिशा करून पत्त्यावर समक्ष जाऊन, प्रॉपर्टी मिसिंग मधील मोबाईल धारकांचे विविध कंपनीचे एकूण ७७ मोबाईल फोनचा शोध घेऊन, एकूण दहा लाख ३५ हजार पाचशे रुपये किमतीचे मोबाईल फोन तक्रारदार यांना देण्याकरिता हस्तगत करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
सदर कामगिरी श्री, सुभाष बुरसे, माननीय पोलीस उपायुक्त, सो,परिमंडळ १ ठाणे श्री उत्तम कोळेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त ,सो ,कळवा विभाग ठाणे व श्री ,अशोक उत्तेकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांचे मार्गदर्शनाने व सूचनाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सह पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धोंडे, सर पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे, सो .पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शिंदे ,पोलीस हवालदार /६६१४ राहुल पवार, पो. हवा./३४१८ वैभव जोशी, पो. शिपाई,/८०६६ प्रशांत लवटे,pi. शिपाई,/२४०१ महादेव हजारे व po, शिपाई,/१८५४ सुरेश रेपाळे, पो, शिपाई,/२०० स्वप्निल खपाले, यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.




