राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा कार्यकर्त्याचा वाढ दिवस साजरा..
रायगड जिल्हा कार्याध्यक्ष मा, सचिन गायकवाड यांचा वाढ दिवस उत्साहात साजरा.

*रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गायकवाड यांचा* **वाढदिवस* *उत्साहात साजरा*
पनवेल | प्रतिनिधी दिनांक १८/७/२०२५ रोजी
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गायकवाड यांचा वाढदिवस पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात अत्यंत उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.
या वाढदिवसाच्या कार्यक्रमास संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी, अन्याय अत्याचार निवारण समितीचे राज्य सचिव प्रीतमसिंग चौहान, रायगड जिल्हा अध्यक्ष धनाजी पुदाले, रायगड जिल्हा सचिव राजपाल शेगोकार, जिल्हा सहसचिव महेंद्र माघाडे, जिल्हा संघटक उमाजी मंडले, खालापूर तालुका अध्यक्ष बाळाराम सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी, पत्रकार बंधू व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी सचिन गायकवाड यांच्या कार्याची आणि व्यक्तिमत्वाची प्रशंसा केली. संघासाठी त्यांचे योगदान हे निस्वार्थ, निष्ठावंत आणि प्रामाणिक आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल बोलताना काहींनी त्यांना “बहुरंगी व्यक्तिमत्व”, “समाजातील प्रत्येक घटकांसाठी अहोरात्र झटणारे कार्यकर्ते”, तसेच “प्रामाणिक आणि लोकहिताच्या कामासाठी कटीबद्ध असलेले नेतृत्व” अशी गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्ण महाराष्ट्रातून राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने सचिन गायकवाड यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले




