Uncategorized

पत्रकारांना टोल माफी मिळणे बाबत.

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ यांनी ठाणे जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिले.

प्रतिनिधी ठाणे.

*टोल माफीसाठी पुरोगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन*

प्रतिनिधी – ठाणे | दिनांक : १८/०७/२५
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ, ठाणे यांच्या वतीने भारतभरातील अधिकृत प्रेस ओळखपत्र असलेल्या पत्रकारांना राष्ट्रीय महामार्गांवर टोल माफी मिळावी, या मागणीसाठी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

पत्रकार हा देशाच्या चौथ्या स्तंभावर कार्य करणारा समाजहिताचा घटक असून, तो विविध ठिकाणी वार्तांकनासाठी सतत प्रवास करत असतो. त्यामुळे त्याला टोल माफी देणे ही काळाची गरज आहे, असे मत संघाने व्यक्त केले. पत्रकार हे अहोरात्र कार्यरत राहून सामाजिक भान जागृत ठेवण्याचे काम करतात, म्हणून टोल माफी मिळणे त्यांचे हक्काचे आहे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

हे निवेदन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. विजयजी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणे जिल्हाध्यक्ष मा. श्रावण पाटील, अन्याय अत्याचार निवारण समितीचे अध्यक्ष मा. राजेश चौहान, संघाचे सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष प्रवीण माळी, सहसचिव नितीन पाटील, संघटक सौ. शोभा लोणारे, सहसचिव संजय देशपांडे, आणि शहराध्यक्ष मा. सागर साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे उपजिल्हाधिकारी मा. संदीप माने यांच्याकडे सादर करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button