बेलापूर, दि.१४ : बेलपाडा येथील जमीन पूर्वी संपादित झाली आहे की नाही. याची कागदपत्रांद्वारे पूर्ण शहानिशा न करता, केवळ राजकीय दबावाखाली ही जमीन ‘एकास एक’ धर्तीवर संपादित करण्याचा प्रकार पहिल्यांदाच सिडकोत घडला आहे या भूखंडवाटप प्रकरणात तब्बल ६० कोटी रुपये किमतीचा २५०० चौ. मी. क्षेत्रफळाचा भूखंड सिडकोने भूधारक शिरीष घरत यांना खारघर येथे दिला आहे. हे प्रकरण आता ईडीच्या रडारवर आले असून या व्यवहाराची कागदपत्रे सादर करण्यासाठी ईडीने सिडको अधिकाऱ्याला नोटीस बजावली आहे.
बेलपाडा येथील जमीन संपादित न करता, त्यावर सिडकोने विकासकामे केली आहेत. आमची जमीन सरकारने भूसंपादनातून वगळली आहे, असा दावा करत भूधारक शिरीष घरत यांनी तेवढीच जमीन सिडकोने खारघर येथे
भूखंड व्यवहारप्रकरण द्यावी अशी मागणी केली होती. राजकीय दबावाखाली ही मागणी तत्काळ मान्य करत सिडकोने खारघर सेक्टर ७ येथे किमान ६० कोटी रुपये बाजारमूल्याचा भूखंड घरत यांना दिला.
परंतु जी जमीन सिडकोला संपादित होणार होती, ती जमीन घरत याने त्रयस्थ विकासकाला विकल्याची कागदपत्रे सिडकोच्या हाती लागली. त्यामुळे भूधारकाने सिडकोची जाणूनबुजून फसवणूक केल्याप्रकरणी शहर वसाहत विभागातील तत्कालीन अधिकारी आशा बनसोडे यांनी भूधारक शिरीष घरत यांच्या विरोधात सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.या गुन्ह्याच्या तपासात आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हस्तक्षेप केला आहे. याभूखंडवाटप प्रकरणातील सर्व कागदपत्रे ईडीने सिडको अधिकाऱ्यांकडून मागितली आहेत. सिडकोतील एखाद्या भूखंड व्यवहारात पहिल्यांदाच ईडीची नोटीस प्राप्त झाल्याने सिडको अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
भूसंपादनात केल्याप्रकरणी सिडकोने भूधारक फसवणूक शिरीष घरत यांच्या विरोधात सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना दिलेल्या भूखंडाचा करारनामा रद्द केला होता. सिडकोच्या निर्णयाविरोधात घरत यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन पुन्हा तो भूखंड आपल्या नावे करून घेतला.




