Uncategorized

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा भोंगळ कारभार.

महामंडळ परिवहन विभागात जळगाव जिल्ह्यात लिपिक पदाच्या घोटाळा.

**महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा भोंगळ कारभार***

**जळगाव जिल्ह्यात लिपिक पदाचा घोटाळा ***

**महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जळगाव लाखोचा घोटाळा किरण धनगर यांनी केला उघडकीस **

*प्रतिनिधी जळगाव**

जळगाव येथील एसटी महामंडळातील विभाग नियंत्रक पदावर असलेल्या भगवान जगनोर यांचा घोटाळा उघडकीस.
परिवहन महामंडळातील डी सी म्हणजे विभाग नियंत्रक या पदावर नियुक्त असलेले भगवान शंकर जगनोर हे गेल्या चार वर्षापासून जळगाव विभागात एकच जिल्ह्यात एकच पदावर कार्यरत होते, त्यामुळे त्यांनी चार वर्षात जवळपास दहा कोटी रुपयांच्या मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झालेले, तसेच त्यांनी चालक वाहक यांच्या पदोन्नती लिपिक या पदावर करण्यासाठी केलेला भ्रष्टाचार सुद्धा एसटी महामंडळाच्या सुरक्षा खात्याने तपासून पाहिला ,त्यात भगवान शंकर जगनोर यांना जबाबदार धरण्यात आलेले आहे,व तसा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात आलेला आहे, त्यामुळे त्यांची जळगाव येथून त्यांना कार्यमुक्त केले आहे , सदर तक्रार ही किरण नामदेव धनगर, अमळनेर आगार यांनी केली असून त्यात भगवान जगनोर यांनी खरेदी केलेल्या संपूर्ण प्रॉपर्टी चे गट नंबर, सातबारा उतारे, खरेदी तारखा, कोणाच्या नावे खरेदी केलेली आहे इत्यादी सर्व रेकॉर्ड हे सरकारच्या व प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेले आहे ,विशेष म्हणजे त्या प्रॉपर्टीवर कोणत्याही बँकेच्या बोजा नाही. त्या संबंधित सर्व पुरावे दिलेले आहेत, येत्या काही दिवसात त्यांना किरण धनगर यांच्या तक्रारीमुळे मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे, हे प्रकरण किरण धनगर यांनी काढून घ्यावे,म्हणून त्यांनी किरण धनगर यांच्यावर रावेर आगार व्यवस्थापक इब्राहिम पठाण, डी टी एस किशोर वसंत महाजन, ए एम ई निलेश चौधरी ,यांच्या मार्फत वेळोवेळी दबाव आणला, बदलीची धमकी दिली, मारहाणीची धमकी दिली,बडतर्फेची नोटीस दिलेली परंतु किरण धनगर यांनी आपले काम सुरूच ठेवले, झालेला सगळा भ्रष्टाचार हा बाहेर आणून उघडकीस केलेले आहे, त्यात भगवान शंकर जगनोर यांनी किरण धनगर यांना बदलीची धमकी दिली, मारण्याची धमकी दिली, बडतर्फ ची नोटीस दिली तरी सुद्धा किरण धनगर हे त्यांच्या कोणत्याही धमकीला न घाबरता ,त्यांचा झालेला भ्रष्टाचार उघडकीस केला. किरण धनगर यांनी जवळपास १५ ते २० ठिकाणी सरकार दरबारी तक्रारी दिलेल्या आहेत , काही ठिकाणी ईमेल केलेले आहेत, त्या तक्रारीत सुद्धा तथ्य आढळल्यामुळे जगनोर यांच्यावर कारवाई झालेली आहे, परंतु ती प्रॉपर्टी जोपर्यंत सरकारी दरबारी जमा होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही ,असे किरण धनगर यांच्याशी माध्यमांनी संवाद साधल्यावर त्यांनी सांगितले, किरण धनगर यांनी नांदगाव येथे जाऊन भगवान जगनोर यांच्या विषयी चौकशी केली,भगवान शंकर जगनोर यांनी त्यांच्या आई विरुद्ध नांदगाव कोर्टात दावा दाखल केला आहे, त्या खाजगीदाव्यात कोर्टात हजर असून सुद्धा एसटी कडून दिवस भरून घेतलेले आहेत, काही प्रॉपर्टी त्यांनी नातेवाईकांच्या नावे घेतली असल्याचे समजते,असे बरेचसे पुरावे किरण धनगर यांच्या हाती लागलेले आहेत,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button